संजय गांधी निराधार अनुदान योजना 2025 : Sanjay gandhi niradhar anudan yojana 2025 – संपूर्ण माहिती, लाभार्थी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Sanjay gandhi niradhar anudan yojana 2025

Sanjay gandhi niradhar anudan yojana ही राज्यातील निराधार, दिव्यांग, विधवा, अनाथ आणि अत्यंत आर्थिक दुर्बल असलेल्या नागरिकांसाठी एक मोठी आणि दिलासादायक वार्ता समोर आली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ (Sharavanbal) सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत मिळत असलेले अनुदान सरकारने आता 1500 रुपयांवरून डायरेक्ट 2500 रुपये हे प्रत्येक महिन्याला लाभ घेत असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा होणार असल्याचे नुकतेच घोषित केलेले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या वाढीमुळे राज्यातील लाखो अनाथ ,विधवा व अनेक गरजूंना या योजनेचा मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजना विशेषत: कोणासाठी आहे –

ही एक महाराष्ट्र सरकारची आर्थिक मदत योजना असून, अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांना आर्थिक आणि शारीरिक कारणांमुळे स्वावलंबी होणे कठीण जात आहे.

हा लाभ कोणासाठी ?

  • निराधार व्यक्ती
  • विधवा महिला
  • अनाथ मुले
  • दिव्यांग
  • गंभीर आजाराने ग्रस्त असलेली व्यक्ती
  • कोणाचेही आधार नसलेले सर्वसामान्य नागरिक

या योजनेदवारे सर्वांना दरमहिन्याला आर्थिक मदत केली जाते.

सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोणाला ?

  • 4,50,700 संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थींना
  • 24,003 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींना असा

एकूण मिळून जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांना प्रत्येक महिन्याला अधिक रक्कम केंद्र सरकारकडून मिळणार आहे.

या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो ? – Eligibility Criteria

1. वयाची अट (Age Limit )

  • निराधार-दिव्यांग व्यक्ती — वय 18 ते 65 वर्षे
  • विधवा — 18 वर्षांपेक्षा जास्त
  • अनाथ मुले — 0 ते 18 वर्षे

2. आर्थिक अट

वार्षिक उत्पन्न 21,000 रुपयांपेक्षा जास्त नसावे
(ग्रामीण व शहरी भागातील दोन्हींसाठी सारखेच निकष)

3. आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड (Adhar Card)
  • रहिवासी दाखला (Residence Proof)
  • उत्पन्नाचा दाखला  (Income Proof)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)
  • बँकेचे चालू खाते (Current Bank Account)
  • दिव्यांग प्रमाणपत्र
  • विधवा असल्यास मृत्यु प्रमाणपत्र (पतीचे)
  • अनाथ मुलांसाठी त्या संबंधित प्रमाणपत्रे

महत्वाचे

4. अन्य नियम आणि अटी – Terms and Conditions

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

या योजनेमध्ये सरकारकडून किती रुपयांची आर्थिक मदत दिली जाते ?

पूर्वी ₹ 1,500 दरमहिना
सध्या (ऑक्टोबर 2025 पासून)  ₹2,500 दरमहिना

ही रक्कम थेट DBT (Direct Bank Transfer) द्वारे बँक खात्यात जमा होते.

अर्ज कसा करायचा ? How to Apply Online ?

या योजनेचा ऑनलाइन अर्ज महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत DBT पोर्टल (Official Website) वर केला जातो.

 Official Website (Online Apply Link)

https://dbtportal.maharashtra.gov.in

 Apply – पूर्ण प्रक्रिया

वेबसाइट उघडा

 तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपवर https://mahadbt.maharashtra.gov.in
ही सरकारची अधिकृत वेबसाइट उघडा.

New Applicant Registration वर क्लिक करा

तुमचा आधार क्रमांक टाका (Enter Adhar Number)

OTP मिळाल्यावर verify करा

Mobile नंबर आणि Email verify करा.

Username आणि Password तयार करा. आता तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर तुम्ही परत लॉग इन करू शकता.

पुन्हा Login करा

Username टाका > Password टाका > Captcha टाका > Log in या बटणावर क्लिक करा.

योग्य योजना निवडा

Social Justice & Special Assistance Department निवडा.
 दिलेल्या यादीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना (Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana) निवडा

अर्ज फॉर्म भरणे

दिलेल्या अर्जामध्ये पुढील तपशील भरावे लागतात

वैयक्तिक माहिती (Personal Information)

पत्ता (Adress)

उत्पन्न माहिती (Income Details)

बँक तपशील (Bank Details)

कुटुंबाची माहिती (Family Information)

दिव्यांग असल्यास माहिती

आवश्यक असलेली कागदपत्रे Upload करा

  • आवश्यक कागदपत्रे
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उत्पन्नाचा दाखला (7/12 किंवा 8A लागू असेल तर)
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (Identy Size Photo)
  • दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • विधवा असल्यास पतीचे मृत्यु प्रमाणपत्र (Death Certificate)
  • अनाथ मुलांसाठी संबंधित अधिकृत कागदपत्रे

Final process  – अंतिम प्रक्रिया

भरलेली सर्व माहिती तपासून पहा.

Save करून भरलेल्या अर्जाचा Preview पहा

Final Submit करा

Acknowledgement / Application ID डाउनलोड करा.

ऑनलाइन अर्ज सबमिट झाल्यावर पुढील प्रक्रिया काय होते?

१) दस्तऐवज पडताळणी

तुमचा अर्ज स्थानिक तलाठी / ग्रामसेवक किंवा तालुका तहसील कार्यालय येथे पडताळला जातो

तुम्हाला आवश्यक असल्यास कॉल किंवा प्रत्यक्ष भेट घेतली जाऊ शकते.

 २) अर्ज मंजुरी प्रक्रिया

तहसील कार्यालय > जिल्हा कार्यालय > समाजकल्याण विभाग
या तीन स्तरांवर अर्ज तपासून त्याची मंजुरी दिली जाते.

या योजनेचा लाभ कधीपासून मिळतो ?

तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर लगेच पुढील महिन्यापासून लाभ सुरू होतो.

सर्वसाधारणपणे मंजुरी मिळायला 45 ते 90 दिवस लागतात.

तालुका व जिल्हयानुसार कमी-जास्त वेळ लागू शकतो.

अर्ज एकदा मंजूर झाल्यावर ₹2,500 महिना थेट DBT द्वारे – तुमच्या बँक खात्यात जमा होतो.
रक्कम दर महिन्याला नियमित जमा होते.

About me

मी PublicVartaचा संस्थापक असून, शासकीय योजना आणि सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात मला 4+ वर्षांचा अनुभव आहे.
सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने सरकारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.