भारत सरकारने Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025 ही योजना अनेक वर्षांपासून देशात सुरू केली आहे.यामुळे देशातील गरीब, अल्प व मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सबका घर या उद्देशाने पक्के घर उपलब्ध करून देण्याचा यामागे शासनाचा हेतू आहे.पण सध्याच्या परिस्थितीनुसार पाहता वाढती महागाई,घरांच्या प्रचंड किमती आणि कर्जावरील व्याजदर (Loan intrest) लक्षात घेतला तर कमी-मध्यम प्रमाणात उत्पन्न असलेल्या लोकांसाठी घर घेणे ही खूप मोठी गोष्ट झाली आहे.हीच समस्या ओळखून भारत सरकारने Pradhan Mantri Awas Yojana 2025 -प्रधानमंत्री आवास योजना 2025 सुरू केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना कोणासाठी आहे ? Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025 – Beneficiaries
ही योजना खालील लोकांसाठी लागू केली आहे.
- ज्या लोकांना स्वतःचे पक्के घर नाही.
- आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांना (कमी उत्पन्न गट -EWS)
- LIG (Low Income Group) -कमी उत्पन्न गट
- MIG – मध्यम उत्पन्न गट
- शहरी झोपडपट्टीतील लोक
- ग्रामीण भागातील गरीब कुटुंबे
- महिलांच्या नावाने घर घेणाऱ्यांना कुटुंबांना प्राधान्य
- SC/ST, OBC, अल्प उत्पन्न असलेले कुटुंबे
- दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक
प्रधानमंत्री आवास योजना – Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025 (पात्रता -Eligibility Criteria)
| घटक | पात्रता (Eligiblity) |
| वार्षिक उत्पन्न (Annual Income) | – आर्थिक दुर्बल घटक – ₹3 लाखापर्यंत – कमी उत्पन्न गट – ₹3–6 लाख – मध्यम उत्पन्न गट – ₹6–12 लाख – मध्यम उत्पन्न गट 2 – ₹12–18 लाख |
| घराची सद्य परीस्थिती | अर्जदाराकडे भारतात कुठेही पक्के घर नसावे. |
| सरकारी घर योजनेचा लाभ | अर्जदाराने कोणतीही housing subsidy पूर्वी घेतलेली नसावी |
| कुटुंब | पती-पत्नी किंवा अविवाहित मुले |
| महिला सहमालकी | जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी शहरी भागामध्ये महिला सहमालकी असणे आवश्यक आहे. |
| नागरिकत्व (nationality) | अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. |
| वय (Age) | अर्जदाराचे किमान 18 वर्षे पूर्ण असावे. |
| झोपडपट्टीतील निवड ( शहरी भाग ) | सर्वे नुसार झोपडपट्टी क्षेत्रातील कुटुंबे पात्र असतील. |
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents) | Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025
अर्ज करताना खालील documents लागतात
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- PAN Card
- घराचा मालकी हक्क नसल्याचे हमीपत्र.
- पत्त्याचा पुरावा – लाईट बिल (Electricity Bill) / रेशन कार्ड (Ration Card) / मतदान ओळखपत्र (Voter ID)
- उत्पन्नाचा पुरावा (Income Certificate / Salary Slip)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)
- मोबाईल नंबर आणि ईमेल ( Mobile Number And Email ID)
हे पण वाचा : कृषी समृद्धी योजना 2025 – https://publicvarta.in/krushi-samruddhi-yojana-2025-online-application/
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणारे मुख्य फायदे – Benefits | Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025
- घर बांधण्यासाठी किंवा घर खरेदीसाठी ₹2.67 लाखांपर्यंत कर्जावर व्याज सवलत
- ग्रामीण भागात पक्के घर बांधण्यासाठी ₹1.20 लाख ते ₹1.30 लाख रु. पर्यंत मदत
- शहरी गरीबांसाठी विशेष हाऊसिंग प्रोजेक्ट (Special Housing Project)
- दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरातील शक्यतो तळमजल्याची पसंती.
- महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- कर्जावरील व्याजदरात 3% ते 6.5% टक्क्यापर्यंत सवलत (Loan Category नुसार)
- शहर आणि गाव या दोन्ही भागासाठी लागू (Urban And Rural Area)
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज कसा करावा? How to Apply – Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025
केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
शहरी भागासाठी (Urban Area)
https://pmay-urban.gov.in/
ग्रामीण भागासाठी (Gramin Area)
https://pmayg.nic.in/
Citizen Assessment निवडा
- Apply Online Citizen Assessment
- तुमचा उत्पन्न गट निवडा
Aadhaar Verification
आधार क्रमांक टाकून OTP Verify करा (Enter Adhar Number And Verify OTP)
अर्ज काळजीपूर्वक भरा
- वैयक्तिक माहिती (Personal Information)
- पत्ता (adress)
- कुटुंबाची माहिती ( Family Information)
- घराची सद्य परीस्थिती
- बँक तपशील (Bank Details)
- उत्पन्नाची माहिती (Income Details)
Documents Upload करा
- आधार कार्ड (Adhar Card)
- PAN कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)
- पत्त्याचा पुरावा (Adress Proof)
अर्ज Submit करा. (Final Submit)
- अर्ज सबमिट करा
- एक Acknowledgment Slip किंवा Application Number (ID) मिळेल.
- भविष्यात अर्जाचे Status तपासण्यासाठी भरलेला form जतन करा
Status Check
- Track Your Assessment Status या Option वर Click करून अर्जदार अर्जाची स्थिती पाहू शकता
प्रधानमंत्री आवास योजनेची (PMAY) ची अधिकृत लिंक (Official Website Links) | Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025
| योजना | अधिकृत लिंक (Official Link) |
| PMAY Urban (शहरी भाग) | https://pmay-urban.gov.in/ |
| PMAY Gramin (ग्रामीण भाग) | https://pmayg.nic.in/ |
PMAY – (FAQ) | Pradhan Mantri Awas Yojana (PMAY) 2025 | प्रधानमंत्री आवास योजना
Q1. माझं घर किंवा जमीन नाही तरी या योजनेसाठी अर्ज करता येईल का ?
हो. जर तुमच्याकडे स्वतःचं जमीन किंवा घर नसले आणि कर्ज घ्यायची तयारी असेल, तर Credit-Linked Subsidy Scheme – CLSS) अंतर्गत अर्ज करता येतो.
Q2. PMAY साठी अर्ज ऑनलाइन करायचा आहे का अगदी अनिवार्य आहे? किंवा ऑफलाइन पण चालेल का?
हो. सर्वात सोयीस्कर मार्ग ऑनलाईन आहे अधिकृत PMAY पोर्टलवर जाऊन अर्ज करता येतो.
पण जर इंटरनेट नाही किंवा सुविधा कमी असतील, तर काही ठिकाणी स्थानिक सरकारी कार्यालये (Local Govt Office) किंवा Common Service Centres यांच्या ,मदतीने ऑफलाइन मदत मिळू शकते.
Q3.आधीपासून पक्के घर असलेले नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात का ?
नाही – जर तुमच्याकडे भारतात कुठेही पक्का (pucca) घर असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही. ज्यांचे घर कच्चे / अपूर्ण किंवा झोपडपट्टीसारखे आहे अशा कुटुंबांसाठी ही योजना आहे.
Q4. PMAY चे पैसे थेट खात्यात येतात का?
हे पूर्णपणे योजनांच्या प्रकारावर अवलंबून असते. CLSS (Credit-Linked Subsidy Scheme) बँक तुमच्या loan account मध्ये सबसिडी जमा करत असते.
PMAY Gramin (ग्रामीण भाग ) घर बांधणी अनुदान- टप्प्याटप्प्याने (instalments) थेट अर्जदाराच्या बँक खात्यात DBT (Direct Bank Transfer) द्वारे रक्कम पाठवली जाते.
Q5. PMAY अर्ज एकदा रिजेक्ट झाला तर पुन्हा करू शकतो का ?
हो. जर तुमचा अर्ज काही कारणांमुळे Reject झाला असेल (उदा. चुकीची माहिती, कागदपत्रे अपूर्ण) तर ते दुरुस्त करून नवीन अर्ज पुन्हा त्याच पद्धतीने करता येतो.





