PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra | प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2025

भारतातील कारागीर व हस्त कलाकार समाजाच्या सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी भारत सरकारद्वारे (PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra) प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना भारतातील कारागीरांना व हस्त कलाकारांना कौशल्य विकास (Skill Developement), प्रशिक्षण (Training) आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देते. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळाच्या समितीने नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. १३,००० कोटी रुपयांच्या पीएम विश्वकर्मा योजना (PM Vishwakarma Yojana), जी पुढील पाच वर्षात – 2023-24 ते 2027-28 या कालावधीत भारत देशातील पारंपरिक कारीगर आणि हस्तकलाकार लोकांसाठी एक त्यांच्या व्यवसायाला नवीन संधी उपलब्ध होऊ शकते.

आपल्या घरगुती आणि परंपरागत चालत आलेल्या कौशल्यावर, मेहनतीवर आणि उपलब्ध असलेल्या साधनांवर विसंबून असलेले हजारो कारागीर,सुतार,लोहार, सोनार, मूर्तिकार, कुंभार, चांभार,अशा प्रत्येक कारागीर व हस्त कलाकारांना एक नवीन दिशा देण्याचा भारत सरकारचा उद्देश आहे.

हे पण वाचा :

खरं सांगायचं झालं तर, या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या व परंपरागत व्यवसायांच्या मागे असलेली कला या जगात कुठेच सहज सापडत नाहीत. काळानुसार पण वेळ बदलली, नवनवीन मशीन आली, जागतिक स्तरावर स्पर्धा वाढली आणि या कारीगरांच्या हातातील कला लोप पावत चालली. हीच परंपरागत कला पुन्हा एकदा जिवंत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कौतुकास्पद निर्णय घेऊन या लोकांसाठी एक मजबूत आधार बनला आहे.

या योजनेत (PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra) हस्त कलाकार व कारीगरांना लाभलेला एक महत्त्वाचा लाभ म्हणजे PM Vishwakarma Certificate आणि Digital ID (पीएम विश्वकर्मा सर्टिफिकेट आणि डिजिटल आयडी) मिळणार आहे. म्हणजेच, तुमचे कौशल्य आता अधिकृतपणे ओळखले जाईल.

या योजनेत हस्त कलाकार व कारीगरांना याशिवाय सर्वात मोठा फायदा म्हणजे कमी व्याजदराचे कर्ज व फक्त ५% सवलतीच्या व्याजदराने, पहिल्या टप्प्यात ₹1 लाख आणि दुसऱ्या टप्प्यात ₹2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
आजच्या काळात इतक्या कमी व्याजदराने कर्ज मिळणे ही कारीगरांसाठी खूप मोठी मदत आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेचा इथेच फायदा थांबत नाही. या कारीगरांना नवीन कौशल्य, आधुनिक अवजारे, आणि कामातील त्रुटि सुधारण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुमची कला टिकवण्यापासून ते ती जगापर्यंत पोहोचवण्यापर्यंत सरकार तुमच्या सोबत असणार आहे.
आजवर अनेक वर्षे टिकलेल्या या कला, उद्या तंत्रज्ञानाच्या युगातही अभिमानाने उभी राहावी हा या पीएम विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Yojana 2025) उद्देश आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही सर्वसामान्य लोकांसाठी महत्वाची योजना असून या योजनेकरिता खालील व्यवसाय करणारे लोक पात्र असणार आहेत.

  • ज्यांच्याकडे छोटासा कारखाना नाही किंवा ज्यांना मोठ्या भांडवलाची सुविधा नाही अशा हस्तकला व कारीगर कुटुंबांसाठी.
  • जो स्वतः मेहनत करतो, परंतु आवश्यक असलेली आधुनिक उपकरणे, किंवा कर्ज न मिळाल्यामुळे व्यवसाय वाढवत नाही अशा कुटुंबांसाठी.
  • ज्या कुटुंबात परंपरागत कलागुण आहेत पण आधुनिकतेच्या युगात रस नाही अशा लोकांना नवीन मार्गदर्शन व संधी मिळेल.
  • ग्रामीण भाग(Rural Area), शहरी झोपडपट्टी(Urban Area), खेडेगावातील कारीगर व हस्त कलाकार वर्गासाठी, कारण अशा लोकांपर्यंत या सरकारी योजना पोहोचणं कठीण असतात.

पीएम विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishwkarma Yojana 2025 ) पुढील अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश केला जाणार आहे.

अ. क्र. व्यवसाय
1सुतार
2 होडीबांधणी कारागीर
3चिलखत बनवणारे
4लोहार
5हातोडी आणि इतर अवजार तयार करणारे
6कुलूप बनवणारे
7सोनार
8कुंभार
9शिल्पकार
10चर्मकार ( चांभार )
11मेस्त्री (Mistri)
12टोपल्या – चटया – झाडू बनवणारे कारागीर
13पारंपरिक बाहुल्या व खेळणी बनवणारे
14केशकर्तनकार
15फुलांचे हार बनवणारे
16धोबी
17शिंपी
18मासेमारीचे जाळे विणकाम करणारे

आवश्यक कागदपत्रे ( Required Documents) | PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra

  • आधार कार्ड (Adhar Card)
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • उत्पन्न प्रमाणपत्र Income Certificate)
  • जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
  • ओळखपत्र (Identy Proof)
  • पत्त्याचा पुरावा (Adress proof)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो (Passport Size Photo)
  • बँक पासबुक (Bank Passbook)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)

सविस्तर अर्ज प्रक्रिया – PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra

आधार आणि मोबाइल नंबर Verification

सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) वर जाऊन तुमचे आधार कार्ड आणि मोबाइल नंबर Verify करणे आवश्यक आहे. तुमची ओळख निश्चित करण्यासाठी ही Verification प्रक्रिया आवश्यक आहे.

कारीगर नोंदणी (Registration)

मोबाइल आणि आधार कार्ड नंबर verification करून झाल्यावर तुम्हाला CSC द्वारे तुमची कारीगर नोंदणी करावे लागेल. ही नोंदणी प्रक्रिया सिद्ध करते की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि तुमची व्यावसायिक ओळख मान्यताप्राप्त आहे.

अर्ज भरणे

पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला तुमची सर्व माहिती CSC केंद्राद्वारे Submit करून या योजनेसाठी अर्ज करावा लागेल. यात तुमची वैयक्तिक माहिती (Personal Information), व्यावसायिक माहिती (Business Information) आणि आवश्यक कागदपत्रांची (Required Documents) Scan करणे बंधनकारक असेल.

नंतर अर्जात तुम्ही दिलेली सर्व माहिती ग्रामपंचायत किंवा शहरी स्थानिकांच्या द्वारे प्रथम टप्प्यात Verify केली जाईल. त्यानंतर आणखी 2 टप्प्यांच्या Verification नंतर तुमची सर्व माहिती योग्य आढळून आली आणि तुम्ही योजनेसाठी पात्र असल्यास तुमचा अर्ज मान्य केला जाईल.

ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्यानंतर

ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक असलेल्या प्रशिक्षणानंतर PM Vishwakarma Digital ID आणि Certificate किंवा विश्वकर्मा प्रमाणपत्र दिले जाईल.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक पात्रता – (Eligiblity criteria) PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार विश्वकर्मा योजनेअंतर्गत 18 व्यावसाईकांपैकी एका क्षेत्रातील असावा.
  • अर्जदाराचे वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 50 वर्षांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे

For More Information: pmvishwakarma.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाइटला (Official Website) भेट द्या

PM Vishwakarma Yojana 2025 Important Link – महत्वाच्या लिंक्स

PM Vishwakarma Yojana Official Website : Click Here

PM Vishwakarma Yojana Online Apply 2025 Maharashtra
PM Vishwakarma Yojana Official Page

PM Vishwakarma Yojana (Registration Link) : Click here

PM Vishwakarma Yojana (Registration Page)

PM Vishwakarma Yojana (Log in page) : Click here

PM Vishwakarma Yojana (Log in page)


About me

मी PublicVartaचा संस्थापक असून, शासकीय योजना आणि सरकारी नोकऱ्यांच्या क्षेत्रात मला 4+ वर्षांचा अनुभव आहे.
सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने सरकारी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.