सर्वच शेतकरी अपार कष्ट करून पिकं उगवतात, पण हवामानातील बदल, खतपाण्याचा खर्च, कमी बाजारभाव, नवीन तंत्रज्ञानाची कमतरता यामुळे शेतकरी बांधवांची आर्थिक बाजू पूर्ण कोलमडून पडते. शेतकऱ्यांची ही समस्या ओळखून महाराष्ट्र राज्य शासनाने (Krushi Samruddhi yojana) ‘कृषी समृद्धी योजना 2025’ सर्व शेतकरी बांधवांसाठी लागू केली गेली आहे.

ही योजना शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादनक्षमता वाढवणे, शेतीसाठी आधुनिक नवनवीन तंत्रज्ञान (New technologies) उपलब्ध करून देणे आणि शेतीतून अधिकाधिक नफा मिळवणे या तिन्ही गोष्टींवर ही कृषि समृद्धी योजना (Krushi Samruddhi Yojana) आधारित आहे.
कृषी समृद्धी योजना 2025 – Krushi Samruddhi Yojana 2025 – उद्दिष्टे
- खते, बियाणे, औषधे, सिंचनपद्धती यांचा वाढत असलेला खर्च कमी करणे.
- ड्रिप (Drip), स्प्रिंकलर (Sprinkler), माती परीक्षण (Soil Inspection), हवामान अंदाज तंत्रज्ञान यासाठी लागणारी आर्थिक मदत करणे.
- भाजीपाला, फळे, धान्य या सर्व प्रकारच्या पिकांची गुणवत्ता वाढवून त्यांचे जास्तीत जास्त उत्पादन घेणे.
- मालाच्या बाजारभावाची अचूक माहिती व शेतीचे व्यवस्थापन करणे.
- शेतकरी आणि खरेदीदार यांना जोडणारी E-Marketing प्रणाली विकसित करणे.
कृषी समृद्धी योजना 2025 – Krushi Samruddhi Yojana 2025 (प्रमुख फायदे)
| प्रमुख घटक | मिळणारा लाभ |
| आधुनिक उपकरणांना अनुदान (Subsidies for modern equipment) | ट्रॅक्टर(Tractor), पॉवर टिलर, ड्रोन स्प्रे(Drone Sprey) वर मिळणारी आर्थिक मदत |
| बियांंची गुणवत्ता (Seed quality) | प्रमाणित व उच्च उत्पादनक्षम बियाण्यांवर अनुदान |
| कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण (Agricultural Technology Training) | शेतकऱ्यांना Digital व वैज्ञानिक पद्धतीचे प्रशिक्षण |
| हवामान अंदाज (Weather forecast) | शेतामध्ये कोणत्या वेळी कोणते काम करायचे याचे अचूक मार्गदर्शन |
| मोफत माती परीक्षण (Free soil testing) | मातीची गुणवत्ता तपासून योग्य पीक सुचवणे. |
| सेंद्रिय शेतीसाठी मदत (Help for organic farming) | कंपोस्ट युनिट(Compost Unit), नैसर्गिक शेतीवर अनुदान |
कृषी समृद्धी योजनेसाठी लागणारी पात्रता – (Eligibility Criteria)
- खताचे परवाने, सातबारा उतारा (7/12) हे पुरावे आवश्यक आहे.
- दोन्ही प्रकारचे शेतकरी लाभ घेऊ शकतात. (जमीनधारक शेतकरी व भाडेतत्वावरील शेतकरी)
- बागायती,जिरायती, भाजीपाला, फुलशेती, सेंद्रिय शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड -Adhar Card
- सातबारा उतारा – 7/12
- बँक पासबुक – Bank passbook
- मोबाईल नंबर – mobile number
- फोटो – passport size photo
कृषी समृद्धी योजना 2025 (Krushi Samruddhi Yojana 2025) – अधिकृत वेबसाइट (Official Website)
अधिकृत वेबसाइट: https://krishi.maharashtra.gov.in
हे पण वाचा :https://publicvarta.in/sanjay-gandhi-niradhar-anudan-yojana-apply-online-2025/
ऑनलाइन अर्ज कसा करावा ? (How to Apply For Krushi Samruddhi Yojana 2025 )
अधिकृत वेबसाईट उघडा
https://krishi.maharashtra.gov.in
आधार क्रमांक टाका, OTP Verify करा – Enter Adhar Number and Verify OTP
आपले नाव, पत्ता, गाव, शेतीची माहिती भरा.
तेथे Krishi Samruddhi Yojana 2025 (कृषी समृद्धी योजना) निवडा.
PDF किंवा JPG Format मध्ये अपलोड करा.
ड्रिप (Drip), Sprinkler, बियाणे, शेती उपकरणे.
Application ID Save करा. (Save Appplication ID)
वरील सर्व माहिती अचूक आहे ना याची खात्री करा.
तहसील कार्यालय व कृषी कार्यालयाकडून या अर्जाची तपासणी केली जाईल.
अनुदान थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाते.
अर्ज मंजूर झाल्यानंतर 30 ते 60 दिवसांच्या आत अनुदान बँक खात्यात येते.





